ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिव्यांग विदयार्थ्यांकरीता उन्हाळी विशेष शिबिराचे आयोजन

पंचायत समिती सावलीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

पंचायत समिती,सावली तर्फे समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत दिव्यांग विदयार्थ्यांकरीता उन्हाळी सुटृयांमध्ये दिव्यांग विदयार्थ्यांकरीता उन्हाळी विशेष वर्गाचे / शिबिराचे आयोजन दिनांक ३ मे २०२४ ते २४ जुन २०२४ या कालावधीकरीता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे करण्यात आले.‍उन्हाळी विशेष वर्गाचे आयोजन करण्याआधी समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विदयार्थ्यांचे शोध घेणे,पालक भेटी,पालकांचे परवानगी घेणे इत्यादी प्रक्रिया पार पाळुन शिबिराला सुरुवात करण्यात आले.

सदर प्रशिक्षणाच्या उदघाटनीय कार्यक्रम करीता अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे ,तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख जगन्नाथ वाढई,सर्व विषय साधनव्यकती,रोखपाल व पालक वर्ग उपस्थित होते.प्रथमता दिव्यागांचे प्रेरणास्थान लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पमाळ अर्पण करुन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी यांनी दिव्यांग विदयार्थीची गरज व आवश्यक असणा-या सुविधा,शिक्षणाच्या प्रवाहात दिव्यांग विदयार्थी कसे टिकावे,त्यांना गुणवता पुर्ण शिक्षण कसे देता येईल यावर प्रकाश टाकुन विदयार्थ्यांना व पालकांना विस्तृत असे मार्गदर्शन केले.वाढई केंद्र प्रमुख यांनी दिव्यांग विदयार्थ्यांना शिक्षणा सोबत मिळणा-या सवलती,शिष्यवृत्ती व आवशकतेनुसार आरोग्य सुविधा या वर मार्गदर्शन करुन पालक व विदयार्थ्यांन उदबोधन केले

सदर प्रशिक्षण करीता दिव्यांग विदयार्थी १८असुन सामान्य विदयार्थी २२ आहेत. शिबिराची वेळ सकाळी ८:०० ते दुपारी ११:०० पर्यंत आहे.शिबिराची सुरुवात परिपाठ व योगा व्दारे करण्यात येतो.नंतर समावेशित शिक्षण तज्ज्ञ,विषय साधनव्यकती व विशेष शिक्षक यांनी शाळापूर्व कौशल्य प्रवर्गनिहाय (भाषा,गणित व इंग्रजी) यावर आधारीत साहित्याच्या माध्यमातुन कृती घेण्यात येतात.सोबतच नृत्य,क्रिडा/मनोरंजन व आर्ट या कृती मधुन मुलांना मनोरंजनात्मक अध्यापन करुन विदयार्थ्यांच्या बौध्दिक,शारिरीक,सामाजिक व शैक्षणिक क्षमता लक्षात घेऊन मार्गदर्शन करण्यात येतो.सोबतच विदयार्थ्यांना आवश्यकतेनुसार पालकांनी घरी कोणत्या होम थेरपी करता येईल हे सांगण्यात येत असतो.

उदघाटनीय कार्यक्रमाचे सुत्र संचालन समावेशित तज्ज्ञ सुनंदा काकडे,प्रास्ताविक समावेशित तज्ज्ञ प्रिया गोडघाटे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केले.आभार प्रदर्शन विशेष शिक्षक अमोल भोयर यांनी केले.

शिबिराचे यशस्वी करीता केंद्र प्रमुख ,विषय साधन व्यक्ती,रोखपाल यांनी मोलाचे सहकार्य करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये