पो.स्टे. रामनगर हद्दीत जुगार रेड
एकुन 1 लाख 88 हजारांवर माल जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 18.05.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी आदीवासी कॉलोनी, इंदीरा नगर वर्धा येथे महादेव मंदीर जवळ सिमेंट रोडवर सार्वजनिक ठिकानी विजेन्द्र भोयर यांचे घरासमोर आरोपीतांवर जुगार रेड केला असता मौक्यावर 1) शुभम कैलास किन्नाके वय 31 वर्षे रा. इतवारा बजार वर्धा 2) विनोद रामभाउ चौधरी वय 44 वर्षे रा. कासनोर ता.आर्वी जि. वर्धा 3) गिरीष पांढरंगजी मुके वय 44 वर्ष रा. सुदामपुरी वर्धा 4) इम्रान नसीर शेख वय 30 वर्षे रा. इंदीरा नगर, आर्वी नाका वर्धा 5) तनविर कादर शेख वय 38 वर्ष रा. गजानन नगर वर्धा असे मिळुन आले असुन दोन आरोपी मौक्यावरून पसार झाले. मौक्यावरून आरोपीतांचे ताब्यातुन एक आकडे लिहलेला बॅनर, 52 तास पत्ते, तीन मोबाईल टच पॅड वाले, 4 दुचाकी मोपेड वाहन असा एकुन जु.कि 1,88,720/- रू चा मिळुन आल्याने जागीच मौक्का जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली.
पोलीस स्टेशन रामनगर येथे आरोपीतांविरुध्द (1) अपराध क्रमांक 386/2024 कलम 12 म.जु.का.. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. रोशन पंडीत सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खॉन, पो.स्टे.रामनगर येथील पो.उप.नि युसुफ खॉन उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पवन निलेकर,, पो.शि, मंगेश चावरे, समीर शेख, व पो.स्टे. रामनगर येथील क्रर्मचारी पो.हवा. राजेश घाटे, मंगेश शेंडे यांनी यशस्वी रित्या पार पाडली.