ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून दागिने केले लंपास

पोलीसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करुण गून्हा आणला उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

    दिनांक 14/05/2024 रोजी यातील फिर्यादी नामे धर्मपाल माधवराव पाटील वय 35 वर्ष रा. वॉर्ड क 4. समता नगर वर्धा यांनी पो स्टे वर्धा शहर येथे येउन तक्रार दिली कि, ते पोलीस स्टेशन सामोर गाडी लाउन फ्रुटस विक्रीचा व्यवसाय करतात, दिनांक 29/04/2024 रोजी सकाळी 09/00 ते दिनांक 30/04/2024 रोजी सकाळी 07/00 वा दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे कुलूप उघडुन घरातील टेबलच्या ड्रॉव्हर मध्ये ठेउन असलेले 1) नगदी 3,00,000/- रू 2) एक सोन्याची चैन वजन 29.89 ग्रॅम किमत 87,549/- रू. 3) एक सोन्याचे बैसलेट वजन 18.19 ग्रॅम किमत 53,000/- रू असा एकुण किमत 4,40,549/- रू चा माल दिसुन आला नाही, तो त्यांचा भाचा निलेश थुल रा गिटटीखदान, सरदार बेडा, सावंगी मेघे, वर्धा याने चोरूण नेली असल्याचा त्यांचा संशय आहे, अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरूण पो स्टे वर्धा शहर येथे गुन्हे नोंद करण्यात आले.

पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोहवा शैलेश चाफलेकर यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली कि, संशईत ईसम निलेश थुल हा दारू पीउन पैसे उडवत आहे, अशा माहीती वरूण संशईत ईसम निलेश दिलीप थुल वय 24 वर्श रा बेघर वस्ती, गिटटीखदान, सरदार बेडा, सावंगी मेघे, वर्धा, याचा पोहवा शैलेश चाफलेकर व त्यांचे टिमने शिताफिने पो स्टे परीसरात शोध घेतला असता संशईत ईसम निलेश थुल हा त्याचे घरी हाजर मिळुण आला, त्यास ताब्यात घेउन पो स्टे ला आणुन विचारपुस केली असता त्याने सदर चोरी केली असल्याचे कबुल केले, व चोरलेल्या पैशातुन सोने तयार केल्याचे सांगीतले, व ते सोने त्याचे जुने घरी एका टेडीवेअर मध्ये लपवुन ठेवल्याचे सांगीतल्याने त्यास त्याचे जुने घरी नेले असता त्याने घरातील टेडीवेअर मधुन 1) एक सोन्याची मोठी चैन किमत 3,52,344/-रू 2) एक सोन्याचे पदक असलेले मंगळसुत्र किमत 38,590/-रू, 3) एक सोन्याचे लहान डोरले असलेले मंगळसुत्र किमत 37,277/-रू 4) एक सोन्याची चैन किमत 77590/-रू, 5) एक सोन्याची बादामी अंगठी किमत 18982/- रू 6) दोन सोन्याचे बॉल नोजपीन किमत 1890/-रू, 7) नगदी 1,50,000/-रू, ४) एक गुलाबी रंगाचा टेडीवेअर किमत अंदाजे 500/-रू असा एकुण 6,77,173/- रू चा माल काढुन दिल्याने तो आरोपी कडुन हस्तगत केला, वरूण त्यांना अटक करूण वर्धा पोलीसांनी सदर गुन्हा शिताफीने उघडकिस केला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक नुरुल हसन, मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक वर्धा पराग पोटे, यांच्या मार्गदर्शनात पो.उपनि पंकज हेकाड, पोलीस हवालदार शैलेश चाफलेकर, पवन लव्हाळे, पंकज भरणे, प्रशांत वंजारी, राधाकिशन घुगे, पोलीस शिपाई नंदकिशोर धुर्वे, शिवा डोईफोडे, वैभव जाधव, श्रावण पवार, सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये