ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संवर्ग विकास अधिकारी अभिजित पाखरे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत यशस्वी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथिल संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रुप तर्फे नुकतेच सामाजिक व शैक्षणिक अभ्यास दौरा काढला होता या दरम्यान सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथिल लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली या दरम्यान अहेरी येथे संवर्ग विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अभिजित पाखरे यांनी सुध्दा आमच्या या दौऱ्यात सहभाग घेऊन लोकबिरादरी प्रकल्पाची पाहणी केली व समाजसेवक अनिकेत आमटे यांचेशी प्रकल्पाबाबत माहिती करून घेतली व भामरागड परिसरात असलेल्या तीन नद्याचा त्रिवेणी संगमला भेट दिली व या परिसरातील आदिवासी जीवनाच्या शैक्षणिक व सामाजिक जाणिव बद्दलची माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला या दौऱ्यात सहभागी असलेल्या अभिजित पाखरे यांनी आपल्या शैक्षणिक कार्याबद्दल व आपल्या सेवेच्या कार्याबद्दल माहिती दिली अभिजित पाखरे हे नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झाले असून त्यांच्या या सुयशा बद्दल श्री संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रुप चे अध्यक्ष सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार उपाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णा बततुलवार,केंद्रप्रमुख संजय त्रिपतिवार,नथुजी देवाडकर,लक्ष्मण खुटेमाटे, जगदीश ठावरी,रामकृष्ण नागरगोजे, अनिल वाघमारे, गिरीश कामडी आदिनी अभिनंदन केले अभिजित पाखरे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून त्यांनी गडचिरोली जिह्यातील आदिवासी व नक्षल भागात काम करण्याची इच्छा राज्याच्या प्रधान सचिवाकडे केली होती त्यांच्या इच्छेनुसार अहेरी येथे त्यांना बीडीओ म्हणून पोस्टिंग मिळाली होती.

काही दिवसांपूर्वी ते अहेरी येथे रुजू झाले होते रुजू होण्यापूर्वी ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती आता ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुद्धा यश संपादन केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अभिजित पाखरे हे बीड जिल्ह्यातील असून ते ग्रामीण भागातील रहिवासी आहेत ते या भागातील आमच्या दौऱ्यात सहभागी होऊन अनेक सामाजिक व शैक्षणिक विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये