ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावलीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या

प्रभाग क. 10 व 11 मधील महिला धडकल्या नगरपंचायतीवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सावली शहराला नियमित व पुरेसा पाणी पुरवठा व्हावा म्हणुन 12.50 कोटी रुपये खर्चुन महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेद्वारे नवीन जलशुध्दीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली. नगरपंचायत अंतर्गत सदर योजना कार्यान्वीत करण्यात आली मात्र अनेक प्रभागात या योजनेचे पाणी पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्याने पिण्याचे पाणी योग्य प्रमाणात मिळावे यासाठी प्रभाग क्र 10 व 11 मधील महिला सोमवार च्या दिवशी भर उन्हात नगरपंचायतीवर धडकल्या. मात्र नगरपंचायतमध्ये कार्यालयीन दिवशी एकही अधिकारी वा कर्मचारी हजर नसल्याने महिलांना आल्या पावली परत जावे लागले.

नविन जलशुध्दीकरण यंत्रणा ही मागील एक वर्षापासुन कार्यान्वीत करण्यात आली. नळधारकांना पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा व्हावा हा उद्रदेश असतांना मात्र काही प्रभाग ऐन उन्हाळयात तहानलेले असल्याने महिलांमध्ये रोष पहावयास मिळत आहे. नळाची जोडणी करतांना नगरपंचायतीने अनेक जाचक अटी व शर्ती नागरीकांवर लादलेल्या होत्या. त्या अटी व शर्ती पुर्ण करुनही नगरपंचायतीच्या नियोजनाअभावी नळाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नसल्याची ओरड सावली शहरात होत आहे. ऐन उन्हाळयामध्ये महिलांना पाण्यासाठी एल्गार करावा लागत असुन नगरपंचायतीने नळाची समस्या न सोडविल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रभाग क्र 10 व 11 मधील महिलांनी दिला.

 नगरपंचायतीच्या नियोजनाअभावी आम्हाला मागील अनेक दिवसापासुन नळाला योग्य तया प्रमाणात पाणी मिळत नसल्याने ऐन उन्हाळयात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. येत्या दोन दिवसात नळाच्या पाण्याची समस्या निकाली न काढल्यास घागर मोर्चा काढुन आंदोलन तिव्र करु.

– शामलता संतोष कावळे, गृहीणी

नगरपंचायतीचे कर्मचारी कामचुकारपणे करीत असुन पाईपलाईन सुरळीत सुरु असतांना पाण्याचा पुरवठा कमी का होत आहे याकडे संबधीत पाणीपुरवठा अभियंता दुर्लक्ष करीत असल्याने शहरातील नळाच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.

– प्रितम गेडाम सभापती पाणीपुरवठा विभाग नगरपंचायत सावली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये