ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पर्यावरणाचे संवर्धन आपले कर्तव्य – कॅप्टन मोहन गुजरकर 

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त परिसंवाद संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : पर्यावरणाचा समतोल बिघडलेला असून त्याचा विपरित परिणाम दैनंदिन जीवनावर पडत आहे. याकरीता मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे आवश्यक असून आपली जीवनशैली पर्यावरणपूरक करणे गरजेचे आहे. युवावर्गाने याकरीता मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून पर्यावरणाचे संवर्धन आपले कर्तव्य समजावे, असे प्रतिपादन कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांनी स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील एन.सी.सी.युनिट, राष्ट्रीय सेवा योजना पथक व राष्ट्रीय हरित सेना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना 23 एप्रिल रोजी केले.

जागतिक वसुंधरा दिना’निमित्त राष्ट्रीय हरित सेना तर्फे ‘चला वसुंधरा वाचवू या’ विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन.सी.सी. अधिकारी तथा राष्ट्रीय हरित सेना समन्वयक कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे क्षेत्र अधिकारी श्री गिरी,रासेयो सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. जगदीश यावले व प्रा. मेघा फासगे उपस्थित होते.

‘चला वसुंधरा वाचवू या’ विषयावर सार्जंट वैष्णवी शिरभाते, पायल चौके, कोमल शितळे, आकाश कन्नाके, साक्षी येळणे व नयन तुमसरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रा. मेघा फासगे म्हणाल्या आपण दैनंदिन जीवनात पाॅलीथीन बॅगस चा वापर टाळू शकतो. चाॅकलेटचे रॅपर्स तसेच हानीकारक वस्तू बाहेर न फेकता त्याची व्यवस्थित विल्हेवाट करू शकतो तर प्रा. यावले म्हणाले उन्हाळ्यात पक्ष्यांकरीता पाणी ठेवणे, झाडांना पाणी टाकणे, पाॅलीथीन पन्नीचा वापर टाळणे, या सारख्या लहान लहान कृती करून पर्यावरण संवर्धन करू शकतो.

यावेळी एन.सी.सी. ‘सी’ प्रमाणपत्र धारक छात्र सैनिक शेखर भोगेकर, अक्षय जबडे, प्रशिल अंदुरकर, वैष्णवी शिरभाते, संकेत गुजरकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

संचालन कॅडेट कोमल शितळे तर आभार आदित्य तामगाडगे याने मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये