ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन सावंगी मेघे ह‌द्दीतील कुख्यात दारूतस्करा विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीतील मौजा सालोड हिरापुर, ता.जि. वर्धा येथे मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी तसेच गावठी मोहा दारूची अवैधरीत्या विक्री तसेच कच्चा मोहा रसायन सडवा तयार करून गावठी मोहा दारूची हातभट्टी चालवीणारी कुख्यात दारूविकेती महिला नामे शालू सुधिर खोब्रागडे उर्फ शालू सागर येरेकार वय 47 वर्ष रा. सालोड हिरापुर हिचे विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा सन 1949 अन्वये सन 2016 ते 2024 पावेतो एकुण 77 गुन्हयांची नोंद आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी मोहा दारू तसेच देशी दारूचा आपले राहते घरी अवैधरीत्या साठा करून दारूची चोरटी विकी तसेच वाहतुक करीत होती.

सदर कालावधी मध्ये तिचेवर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून लाखो रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर स्थानबध्द दारूविकेती महिला हिचेवर पो.स्टे. ला वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा तिचे दारूविकीचे व्यवसायावर कोणताही परीणाम झालेला नव्हता. ज्यामुळे पोलीस स्टेशन सावंगी मेघे परीसरातील सार्वजनिक स्वास्थावर विपरीत झाला होता तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बाधीत झाली होती.

ठाणेदार सपोनि श्री संदिप कापडे यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्द प्रस्ताव तयार करून श्री प्रमोद मकेश्वर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा यांनी योग्यरीत्या पाठपुरावा करून स्थानबध्दतेचा प्रस्ताव मा. नूरून हसन, पोलीस अधिक्षक वर्धा यांचे मार्फतीने मा. राहूल कर्डीले, जिल्हा दंडाधिकारी वर्धा यांना सादर करण्यात आला होता.

सदर स्थानबध्द प्रस्तावाची वरीष्ठ पातळीवर गंभीर दखल घेवून तसेच आगामी होवू घातलेल्या सार्वत्रीक लोकसभा निवडणूक 2024 लक्षात घेता निवडणूक हया निर्भीड वातावरणात तसेच प्रलोभनमुक्त वातावरणात पार पाडाव्यात या उद्देशाने मोठ्या प्रमाणात दारूची अवैधरीत्या विक्री करणा-यावर आळा घालण्याकरीता स्थानबध्दतेची कार्यवाही करण्यात आलेली आहे. दि. 22/04/2024 रोजी स्थानबध्दतेचा आदेशी जारी करण्यात आलेला असून त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृहात स्थनबध्द ठेवण्यात आलेले आहे.

तसेच पुढे होवू घातलेल्या सार्वत्रीक लोकसभा निवडणुक 2024 लक्षात घेता निवडणूक हया निर्भीड वातावरणात तसेच प्रलोभनमुक्त वातावरणात पार पाडाव्यात या उद्देशान येणाऱ्या कालावधी दरम्यान अशा दारू विक्रेत्यांवर तसेच गुन्हेगारी कृत्य करणा-यांवर कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांनी दिलेले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. डॉ सागर रतनकुमार कवडे व उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक संदिप कापडे ठाणेदार सावंगी मेघे, संजय खल्लारकर, अमोल आत्राम स्थागुशा वर्धा, स.फौ. नबी शेख, पोहवा जावेद धामीया, सतिष दरवरे, मपोहवा सरोज पाली, पो.शि निखील फुटाणे पो.स्टे. सावंगी मेघे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये