ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बहिणाबाई विद्यालयात निरोप समारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील बहिणाबाई विद्यालय नोकेवाडा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उत्तम कराळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सतीश राठोड, नंदेश्वर खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष निखाडे यांनी केले तर सूञसंचालन संघरक्षित तावाडे यांनी केले.

विदयार्थी मनोगत करण खांडेकर, बंटी नरवाडे, नंदिनी थोरात यांनी व्यक्त केले. शिक्षक मनोगत सतीश राठोड, छत्रपती काटकर, संतोष इंद्राळे, प्रशांत पारखी आदींनी व्यक्त केले.

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात उत्तम कराळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग कांबळे, विलास पेंदोर, रमेश गायकवाड, बालाजी चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.आभार संघरक्षित तावाडे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये