ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीच्या आठ विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या शिष्यवृत्ती जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी : येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या आठ गुणवंत विद्यार्थ्यांची भारत सरकारच्या ‘प्रगती’, ‘स्वनाथ’, ‘सक्षम’ आणि ‘यशस्वी’ या प्रतिष्ठित शिष्यवृत्ती योजनांसाठी निवड झाली असून, संस्थेसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्ली यांच्या माध्यमातून या शिष्यवृत्ती गुणवत्तेच्या निकषावर प्रदान करण्यात येतात.‘प्रगती शिष्यवृत्ती’ ही तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने दिली जाते. या अंतर्गत कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागातील वैष्णवी संजय गायकवाड, प्रेरणा सुरेश सुरपाम तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील गायत्री प्रवीण चतारे आणि मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागातील वैष्णवी सुदर्शन गराटे या विद्यार्थिनींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. ‘स्वनाथ शिष्यवृत्ती’ ही पितृछत्र हरवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील श्रेयश राजेंद्र लाडे आणि रितिक विलास भोयर यांची निवड झाली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘सक्षम शिष्यवृत्ती’ अंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील क्रिश देवेंद्र गोहणे यांना तर ‘यशस्वी शिष्यवृत्ती’ अंतर्गत समर्थ अशोकराव बेलोरकर यांची निवड झाली आहे.

       सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे, या शिष्यवृत्ती पदविका अभ्यासक्रमाच्या तीनही वर्षांसाठी उपलब्ध असून, त्यासाठी दरवर्षी संस्थेमार्फत अर्ज सादर करावा लागतो. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी संस्थेचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजन वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मीनल मून यांनी प्रभावी समन्वय साधून अर्ज प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

       या उल्लेखनीय यशाबद्दल प्रभारी प्राचार्य डॉ. राजन वानखडे, उपप्राचार्य डॉ. आशिष बहेंडवार, विभागप्रमुख प्रा. उज्वला रामटेके, प्रा. माधुरी नागदेवे, प्रा. जयंत बोरकर, प्रा. शालिनी खरकाटे, प्रा. इंद्रजीत सांगोळे, प्रा. नितीन डोर्लीकर तसेच सर्व अधिव्याख्याते व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये