ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषिकन्यांनी सांगितले बियाणे वर्गीकरणाचे महत्त्व

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

_ समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कुंभारी येथील शेतकऱ्यांसाठी _बियाणे वर्गीकरण व दर्जेदार बियाण्याची निवड_ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले.

कार्यक्रमात कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना बियाण्याच्या पिशवीवर लावण्यात येणाऱ्या विविध रंगांच्या टॅगबद्दल सविस्तर माहिती दिली. _”पैदासकार बियाण्यावर सोनेरी पिवळा टॅग, पायाभूत बियाण्यावर पांढरा टॅग, तर प्रमाणित बियाण्यावर निळा टॅग असतो. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी नेहमी निळ्या टॅगचे प्रमाणित बियाणेच खरेदी करावे,”_ असे कृषिकन्या प्रतिनिधी यांनी सांगितले.

यावेळी _सत्यप्रत बियाणे_ ज्यावर _फिकट हिरवा टॅग_ असतो, त्याची शासकीय तपासणी झालेली नसते, याबाबतही शेतकऱ्यांना सावध करण्यात आले. “कंपनी केवळ लेबलवर हमी देते, त्यामुळे अशा बियाण्यापासून उत्पादनात घट येऊ शकते,” असे कृषिकन्यांनी स्पष्ट केले.

कृषिकन्यांनी बियाण्याच्या पिशवीवरील लॉट क्रमांक, उगवण क्षमता, भौतिक शुद्धता व आर्द्रता यासारखी माहिती कशी तपासावी हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले. तसेच कागदाच्या दोन घड्यांमध्ये 100 दाणे ठेवून घरीच उगवण क्षमता कशी तपासायची हेही शिकवले.

शिबिराला गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख तथा कार्यक्रम समन्वयक प्रा. मोहजीतसिंह राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. कृषिकन्या _सायली माने, प्राजक्ता शेवाळे, माधुरी कांबळे, माधुरी दुनगहू, अंकिता बिचारे, शामल जमधडे, तृप्ती मोरे, अवंती देशमुख, अंकिता काळे, गौरी सोलंकी, मयुरी झाडे_ यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये