ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी तनय देशकर यांची निवड

पक्ष संघटन, आरोग्य क्षेत्र, राजकारण व सामाजिक उपक्रमात सक्रिय असलेले तनय देशकर करणार युवकांचे नेतृत्व

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :_ भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. हरीशजी शर्मा यांनी नुकतीच आपली जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांना यात संधी देण्यात आली. या सोबतच श्री. हरीशजी शर्मा यांनी जिल्ह्याच्या विविध मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षांची घोषणा केली. भाजपा मधे प्रमुख असलेल्या युवा मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष पदी ब्रह्मपुरी येथील तनय अतुल देशकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील अनेक वर्षापासून भाजपा युवा मोर्चा मध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळणारे तनय देशकर आता जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. या आधी तनय देशकर यांनी ब्रह्मपुरी तालुका सोशल मीडिया सह संयोजक, युवा मोर्चा जिल्हा सचिव, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस म्हणून यशस्वी रित्या काम केले आहे. त्यांच्यातील संघटन कौशल्य, कार्य शैली, वक्तृत्व कौशल्य बघता पक्ष नेतृत्वाने त्यांना जिल्हा अध्यक्ष पदी बढती दिली आहे. देशकर यांच्या रूपाने ब्रह्मपुरी विधानसभेला प्रथमच भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला आहे.

मागील अनेक वर्षापासून तनय देशकर हे ब्रह्मपुरी तालुक्यातील पक्ष संघटन, आरोग्य क्षेत्र व राजकारण व सामाजिक उपक्रमात सक्रिय आहेत. क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबिरांचे नियमित आयोजन देशकर करत असतात. विशेषत्वाने ब्रह्मपुरी तालुक्यात “गाव तिथे शाखा” हा उपक्रम राबवून शेकडो युवकांना भाजपा सोबत जोडण्याचे काम त्यांनी केले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात युवकांची एक मोठी फळी त्यांनी तयार केली आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणे, लोकांच्या अडचणी सोडवत असल्याने तनय देशकर यांची “कामाचा माणूस” म्हणून ओळख आहे. घरातूनच समाजसेवाचा वारसा मिळाले तनय देशकर आता जिल्ह्यात भाजपाचे काम अधिक जोमाने वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत.

या निवडीबद्दल तनय देशकर यांनी भाजपाचे नेते, माजी मंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. अशोकजी उईके, जेष्ठ नेते, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराज भैया अहिर, जिल्हाध्यक्ष श्री. हरीशजी शर्मा, आमदार श्री. बंटीभाऊ भांगडीया, आमदार श्री. देवराव दादा भोंगळे, आमदार श्री. करणजी देवतळे, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या सह सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत.

या सार्थ निवडी बद्दल भाजपाचे जेष्ठ नेते प्रा. कादर शेख, भाजपा नेत्या सौ. वंदना शेंडे, जिल्हा सरचिटणीस सौ. निलम सुरमवार, जिल्हा उपाध्यक्ष श्री. साकेत भानरकर, सचिव श्री. अरविंद नंदूरकर, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रा. अरुण शेंडे, भाजपा नेते श्री. दीपकभाऊ उराडे, शहर अध्यक्ष प्रा. डॉ. सुयोग बाळबुधे, तालुका अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर दिवटे, सिंदेवाही तालुका अध्यक्ष श्री. नागराज गेडाम, सावली तालुका अध्यक्ष श्री. किशोर वाकुडकर, श्री. माणिक पा. थेरकर, श्री. मनोज वठे, नगरसेवक श्री. मनोज भुपाल, शहर महामंत्री श्री. पवन जयस्वाल, माजी सभापती प्रा. रामलाल दोनाडकर, महामंत्री श्री. गोपाल ठाकरे, बाजार समिती संचालक प्रा. यशवंत आंबोरकर, माजी न. प सभापती श्री. विलास विखार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. अविनाश मस्के, शहर अध्यक्ष श्री. अमित रोकडे, श्री. सिद्धू भर्रे, श्री. दत्ता येरावार, श्री. धीरज पाल, श्री. पिंटू आंबोरकर, महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ. वर्षा चौधरी, तालुका अध्यक्ष सौ. शीला गोंदोळे, सौ. रश्मी पेशने यांच्या सह सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तनय देशकर यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये