ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रवीणभाऊ आडेपवार विद्यालयाचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

       प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे या सहकार्यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी आणि त्या विकसित बुद्धीने त्या विद्यार्थ्यांनी आपली विद्या शाखा व राष्ट्र यांची सेवा करावी या हेतूने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून यात अष्टविनायक बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा संचालित प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालय निफंद्रा येथील 7 विद्यार्थी पास झाले त्यापैकी साहिल आकाश आखाडे, श्रुती ईश्वर कोलते हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. सदर विद्यार्थ्यांना वर्ग 12 वी पर्यंत रुपये 12,000 शिष्यवृत्ती मिळणार आहे.

 पात्र विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष गजानन येणंगदलवार, संस्थापक विजय आडेपवार, सचिव रवींद्र आडेपवार, मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षक पालक संघ, व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये