जड वाहनांची वाहतूक वळवून तसेच संबधित ठिकाणी जड वाहनांस प्रवेशबंदी
लोकसभा निवडणूक अनुषंगाने प्रचार सभा दौरा कार्यक्रम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) नुसार सार्वजनीक ठिकाणी रहदारी व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कायदेशीर अधिकारान्वये अतिमहत्वाचे व्यक्तीचा (व्हीआयपी) यांचा लोकसभा निवडणूक अनुषंगाने तळेगांव (शामजीपंत) जिल्हा वर्धा येथे दिनांक 19.04.2024 रोजी प्रसार सभा दौरा कार्यक्रम आयोजीत असून सदर कार्यक्रमास जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील जनता मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे.
या दरम्यान वाहतूक व रहदारीचा प्रश्न निर्माण होवू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून मी नूरूल हसन पोलीस अधिक्षक वर्धा असे निर्देदीत करतो कि, अतिमहत्वाचे व्यक्ती (व्हीआयपी) यांचे तळेगांव (शामजीपंत) येथील सभा स्थळाकडे जाणारा रहदारीचा मार्ग दिनांक 19.04.2024 रोजीचे सकाळी 07.00 ते 21.00 वा. पावेतो जड वाहनांची रहदारी खालील प्रमाणे वळविण्याचे तसेच जड वाहनांव प्रवेशबंदी करण्यात येत आहे.
1. नागपूर अमरावती तळेगांव वरून आर्वीकडे जाणारी जडवाहतूक ही तळेगांव (शामजीपंत) येथून जडवाहतूकीस मज्जाव करण्यात यावा.
2. सदरची आर्वीकडे जाणारी जड वाहतूक ही तळेगांव चिस्तूर जळगांव वर्धमनेरी मार्गे आर्वीकडे जाईल.
3. आर्वीकडून तळेगांवकडे जाणारी जडवाहतूक ही वर्धमनेरी जळगावं तळेगांवकडे जाईल. चिस्तूर मार्गे
4. तळेगांव कडून सभास्थळाकडे येणारी वाहतूक ही नेमून दिलेल्या पार्कीगस्थळी जातील.
5. तळेगांव उडाणपूलापासून तळेगांव ते आर्वी रोडवरील राऊत पेट्रोलपंपपर्यंतचा नो पार्कीग
झोन व नो हॉकर्स झोन घोषीत करण्यात यावा.
वाहन पार्कीगस्थळे खालीलप्रमाणे घोषीत करण्यात यावे.
1. व्हीव्हीआयपी कॅनव्हॉय पार्कीग
2. शासकीय अधिकारी पार्कीग पी.एच.सी.च्या मागील बाजूचे मैदान
3. व्हीआयपी पार्कीग पी.आर. पाटील कॉलेज समोरील शेडच्या बाजूचे खूले मैदान
4. पार्कंग ग्राऊंड 1 आर्वी रोड राऊत पेट्रोलपंप समोरील ग्राऊंड (चारचाकी वाहनाकरीता)
5. पार्कंग ग्राऊंड 2 आर्वी रोड राऊत पेट्रोलपंप व कॉलेज यामधील मैदान (चारचाकी वाहनाकरीता)
6. पार्कीग ग्राऊंड 3 वीट भट्टी समोरील मैदान (दूचाकी वाहनाकरीता)
तरी अतिमहत्वाचे व्यक्ती (व्हीआयपी) यांचे लोकसभा निवडणूक अनुषंगाने तळेगांव (शामजीपंत) जिल्हा वर्धा दौरा कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व जनता व नमूद मार्गाने वाहनाद्वारे प्रवास करणाऱ्या सर्व जनतेने वरील वाहतूक व्यवस्थेचा वापर करून घोषीत पार्कीग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवून वाहतूक व्यवस्थेचे पालन करावे. शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्यास पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.



