ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

 शहरात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आले.

      शहरात १३ एप्रिल चा सायंकाळी पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ येऊन वंदन करत होते. रात्री १० वाजता पासून डी जे च्या गाण्यावर युवक युवती नाचत होते. तिथे जयंती निमित्त केक कापून आतिषबाजी करून अभिवादन केले. प्रत्येक वॉर्डातील चौकात केक कापून आतिषबाजी करून अभिवादन करताना दिसत होते.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नगर परिषद तर्फे प्रशासक विशाल वाघ मुख्याधिकारी यांनी मालार्पण करून अभिवादन केले. पोलीस स्टेशन तर्फे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे यांनी मालार्पण करून अभिवादन केले.

      शहराच्या विविध वॉर्डातून बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता रॅली काढण्यात आली. नगर परिषद जवळ विविध सामाजिक संघटना व पक्षाकडून अल्पोहर तसेच शरबत, पाणी ची व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी सकाळी भीम सकाळ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ जाऊन अभिवादन करताना दिसत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये