ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना जिल्हा संघटक ऍड. युवराज धानोरकर यांची ग्रामीण रुग्णालयातील अन्न विषबाधित रुग्णांना भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           भद्रावती तालुक्यातील माजरी येथील काली माता मंदिरातील महाप्रसादातून शेकडो नागरिकांना अन्न विषबाधा झाली होती या रुग्णांपैकी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलेल्या रुग्णांची शिवसेना शिंदे गटाचे चंद्रपूर जिल्हा संघटक एडवोकेट युवराज धानोरकर यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृती विषयी चौकशी करून या रुग्णांकडून घटनेची माहिती जाणून घेतली.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीश सिंग यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधून या रुग्णांकडे पुरेसे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. या रुग्णांना दोन दिवस भरती ठेवून उपचार देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक युवराज धानोकर यांच्यासोबत युवा सेनेचे प्रदेश प्रतिनिधी हर्षल शिंदे, भद्रावती तालुका संघटक नरेश काळे, शहर प्रमुख पप्पू सारवान आदी उपस्थित होते.

माजरी येथील काली माता मंदिरात आयोजित महाप्रसादातून शेकडो नागरिकांना अन्न विषबाधा झाली यात एका वृद्धाचा मृत्यू झाला. अन्य बाधित 232 नागरिकांना माजरी, वरोरा, भद्रावती व चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये