गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध चोरटी रेतीवर रेड

एकूण 17 लाख 7 हजारांवर माल जप्त 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

विशेष पथक स्था. गु. शा. वर्धा ने पो. स्टे.देवळी हद्दीत यशोदा नदी घाट देवळी येथे चोरटी रेती बाबत रेड केले आहे एकूण मुद्देमाल 17,07,000/ जप्त केला असून घटनास्थळी  आजंती शिवार यशोदा नदी घाट देवळी येथे  1) एक लाल रंगाचा क्रमांक नसलेला नवीन Mahindra585DI ट्रॅक्टर किंमत 7,00,000/ 2) एक लाल रंगाची क्रमांक नसलेली नवीन ट्रॉली किंमत 1,50,000/-₹ व 3) ट्रॉली मध्ये 1 ब्रास रेती किंमत 5,000/-4) एक लाल रंगाचा क्रमांक नसलेला नवीन Mahindra585DI ट्रॅक्टर किंमत 7,00,000/- 5) एक लाल रंगाची क्रमांक नसलेली नवीन ट्रॉली किंमत 1,50,000/-₹ व 6) ट्रॉली मध्ये 1/2 ब्रास रेती किंमत 2000/-₹ असा एकूण किँमत 17,07,000/- चा माल जप्त केला आहे. तसेच आरोपी 1) चालक – मालक – पवन अजबराव गायधने वय 29 वर्षे रा. देवळी 2) चालक – विनोद देविदास पचारे वय 30 वर्षे रा. पडेगाव 3) मालक – मंगेश तायवाडे रा. देवळी., पुढील कारवाई करीता ठाणेदार पो.स्टे.देवळी यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अम. संदिप गावंडे, केलास वालदे, प्रदीप कूचनकर, सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा तसेच चालक पो.अ. शुभम बहादुरे, पो.मु. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये