ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च येथे विकसीत भारत @२०४७ उपक्रमांतर्गत “सायबर सुरक्षा कार्यशाळा” आयोजित

एकूण 124 विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २०-०३-२०२४ रोजी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च येथे विकसीत भारत @२०४७ उपक्रमांतर्गत “सायबर सुरक्षा कार्यशाळा” आयोजन करण्यात आले होते.

सदर सायबर सुरक्षा कार्यशाळेमध्ये श्री. कुलदीप टांकसाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल तथा सायबर तज्ज्ञ आणि श्री. अंकित जिभे, पोलीस कॉन्स्टेबल तथा सायबर तज्ज्ञ सायबर सेल, वर्धा हे कार्यक्रमाचे वक्ते होते. त्यांनी आपल्या भाषणात सायबर सिक्युरिटीच्या मूलभूत गोष्टींबद्दल, सायबर गुन्ह्याबद्दल, सायबर गुन्ह्याची गरज, विविध प्रकारचे गुन्हे, फिशिंग, हॅकिंग, अशा विविध फसवणुकीच्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांबाबत तसेच त्याच्या संबंधित घ्यावयाच्या खबरदारीबद्दल माहिती दिली.

तसेच विविध सोशल मीडियाच्या वापराबाबत श्रोत्यांना माहिती दिली ज्यामुळे विविध सायबर गुन्हे जसे की अकाउंट हॅकिंग, सेक्सटोर्शन आणि प्रायव्हसी प्रोटेक्शन अशा सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेण्याची सूचना त्यांनी सर्व उपस्थितांना केली. त्यांनी उदाहरणे आणि व्हिडिओ प्रात्यक्षिके देऊन ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार समजावून सांगितले. सायबर विभाग आणि वर्धा पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यासाठी त्यांनी हेल्पलाइन क्रमांकही दिले.

सायबर सुरक्षा कार्यशाळेमध्ये शरद पवार डेंटल कॉलेज, श्रीमती राधिकाबाई मेघे कॉलेज ऑफ नर्सिंग, शालिनीताई मेघे कॉलेज ऑफ नर्सिंग, फ्लॉरेन्स नाइटिंगेल कॉलेज ऑफ नर्सिंगचे डॉ. ललित भूषण वाघमारे, मा. कुलगुरू, डॉ. गौरव मिश्रा, मा. प्र-कुलगुरू, डॉ. श्वेता काळे पिसुलकर, कुलसचिव, डॉ. तृप्ती वाघमारे, संचालक, डॉ. राजीव बोरले, महासंचालक, श्रीमती मनीषा मेघे, माननीय संचालक SPDC, डॉ. मनोज चांडक, डीन, डॉ. अंजली बोरले, सीएमएस एसपीडीसी, डॉ विद्या लोहे, डीन (शैक्षणिक), डॉ अलका हांडे, व्हाईस डीन, एसपीडीसी, श्रीमती शर्मिला परिहार, मुख्य प्रशासकीय अधिकारी तसेच एकूण 124 विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते.

कार्यशाळेचे यशस्वितेकरिता मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. मंगेश भोयर, सायबर सेल तसेच पो.हवा. कुलदीप टांकसाळे, पो.शि. अंकित जिभे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये