गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावठी मोहा दारूवर रेड

एकूण 15 लाख 17 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

        दिनांक 29/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा उपविभाग हिंगणघाट पथक तर्फे पो.स्टे. हिंगणघाट परीसरात अवैद्य धंदयावर प्रो.रेड करणे कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर कडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून यातील आरोपीतांवर प्रोरेड केला असता आरोपी आकाश उर्फ लल्ला शिंदे वय 27 वर्ष, रा संत चोखोबा वार्ड हिंगणघाट   हा आरोपी  सिद्धांत ज्ञानेश्वरराव लोणारे वय 26 वर्ष जिल्हा नागपूर यांच्या मदतीने यातील दोन्ही फोर व्हीलर कारणे शिवनी पारधी बेढा, समुद्रपुर येथून आरोपी  विशाल पवार शिवनी पारधी बेडा त. समुद्रपूर जि. वर्धा (पसार)  याचे कडून गावठी मोहा दारू खरेदी करून आणून हिंगणघाट परिसरात आरोपी मारुती सुझुकी स्विफ्ट सिल्वर रंगाची कार क्रमांक एम. एच. 31 सी.एस. 4688 किंमत 5,00,000/-₹, एक बजाज पल्सर टू ट्वेंटी मोटर सायकल क्रमांक एम.एच. 49 ए.एन. 1077 किंमत 1,00,000/-₹ यांच्या मदतीने यातील दोन्ही मोटरसायकलने गावठी मोहा दारूचा माल वाटप करीत असतांना रंगेहात मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातुन 02 फोर व्हीलर, 02 टू व्हीलर, 05 मोबाईल व 1) 24 मोठ्या प्लास्टिक पन्नीमध्ये प्रत्येकी 28 लिटर प्रमाणे एकूण 672 लिटर गावठी मोहा दारू प्रत्येकी 100/-₹ प्रमाणे 67,200/-₹  2) मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर ग्रे रंगाची कार क्रमांक एम. एच. 40 ए.सी. 7025 किंमत 7,00,000/-₹, 3) मारुती सुझुकी स्विफ्ट सिल्वर रंगाची कार क्रमांक एम. एच. 31 सी.एस. 4688 किंमत 5,00,000/-₹, 4) एक बजाज पल्सर टू ट्वेंटी मोटर सायकल क्रमांक एम.एच. 49 ए.एन. 1077 किंमत 1,00,000/-₹, 5) एक बजाज पल्सर टू ट्वेंटी मोटर सायकल क्रमांक एम.एच. 32 ए. इ. 0155 किंमत 1,00,000/-₹, 6) 05 अँड्रॉइड मोबाइल किंमत 50,000/-₹ एकूण जू किंमत 15,17,200/-रू चा मुद्देमाल मिळून आल्याने  जप्त करून आरोपीतांन विरुद्ध अप क्र.- 459/24 कलम :- 65(ई)(अ), 83 म.दा.का. 3(1)181, 130/177 mvact पो.स्टे. हिंगणघाट येथे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.

     सदरची कारवाई माननीय श्री नूरूल हसन पोलीस अधीक्षक वर्धा, माननीय श्री सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री मनोज गभणे स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे निर्देशनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, पवन पन्नासे, मनीष कांबळे, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये