ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वर्धा विधानसभा च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

28 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वर्धा विधानसभा च्या वतीने साजरी करण्यात आली आहे यावेळी वर्धा शहरात सकाळी बाईक रॅली काढत वर्धा शहराची भगवे झेंडे हातात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव जय घोषणे शहरात फेरी काढली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्या अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

त्यानंतर सायंकाळी आर्वी नाका चौक येथे शेर शिवाजी नाट्य च्या माध्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले व ज्येष्ठ शिवसैनिक भजन मंडळ व तसेच वर्धा विभाग मोहीम मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक परिसरात स्वच्छता दर आठवड्यात मोहीम राबवणारे युवक व युती यांचा सत्कार सुद्धा या कार्यक्रम दरम्यान करण्यात आला मोठ्या प्रमाणात आतिशिवाजी करत छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांच्या नेतृत्वात साजरी करण्यात आली व मोठ्या प्रमाणात या जयंती उत्सव सोहळ्यात शिवसैनिकांची गर्दी जमली होती.

यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शिवसेना माजी तालुकाप्रमुख प्रमोद भाऊ देवडे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख भारतीताई कोटमकर, वर्धा शहराचे शिवसैनिक मिलन भाऊ गांधी, अमित भाऊ भोसले, ज्येष्ठ शिवसैनिक माजी सैनिक शामभाऊ परसोटकर, शिवसैनिक किशोर भाऊ धोंगडे, माजी नगरसेवक ज्येष्ठ शिवसैनिक संजूभाऊ दाणी, शिवसैनिक संजय भाऊ पांडे, शिवसैनिक हिरामण भाऊ सातपुडके, शेखर भाऊ इंगोले, अक्षय भाऊ बाळसराफ, कुमार भाऊ हातागळे, शिवसैनिक मनोहर भाऊ नाईक, महिला आघाडीचे भारतीताई थूल यांनी कार्यक्रमाचा संचालन केला, संगीता ताई गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज वर गीत गायन करत कार्यक्रमाची शोभा वाढवली, वरी नाताई निंबाळे यांचा विशेष सहकार्य होता.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये