गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकसभा निवडणूकिची आचार संहिता लागताच ठाणेदार असिफ राजा यांनी ठेवला कडेकोड बंदोबस्त

अवैध दारू तस्करीत सकार्पियो सहित 7 लाख 84 हजारचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर : लोकसभा निवडणूक असल्याने आचार सहिंता लागल्याने शहरातील प्रत्येक गल्लीत, रोड रस्ते मध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे अवैध धंदेवाल्यांवर करडी नजर ठेऊन त्यांचावर कारवाई करीत आहे. अशातच काल रात्रौ दोन ते तीन चा सुमारास बामणी रोड वर sst पॉईंट च्या मागे एक सकार्पियो ला अडवून झडती घेतली असता त्यात 24पेटी देशी दारू आढळली ही अवैध दारू बल्लारपूर हुन दारू बंदी जिल्हा गडचिरोली ला नेण्यात येत होती.

दोन आरोपी व सकार्पियो सहित अंदाजे की,मुद्देमालसह 7लाख 84हजार माल जप्त करण्यात आला त्यातच टु व्हीलर वर अवैध विक्री करिता एका थैलीत दारू नेत असतांना पोलिसांनी जप्त करून कारवाई केली. शहरात दोन वाईन शॉप आणि तीन लायसन्स धारी दुकानें आहेत या दुकानातून चिल्लर विक्री करता येते पण होलसेल विक्री करता येत नाही तरीपण होलसेल विक्री कोणत्या दुकानातून होत आहे याचा तपास करने गरजेचे आहे. शहरात कडेकोड बंदोबस्त असल्याने रेती तस्करी,भंगार चोरी,कोळसा चोरी,सुगंधित तंबाखू तस्करी करणाऱ्याचे धाबे दनानले आहे रात्रीला बेकाम -चोरीचा उद्देशाने फिरणाऱ्यावर पोलीस कारवाई करीत आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक असिफ राजा शेख यांचा माहिती वरून API पांडे, पोलीस उपनिरीक्षक चाटे, ASI गजानन डोईफोडे, सयाम शेख, लखन चौहाण, संतोष दंडेवार, भोयर, यांनी सापळा रचून नाकाबंदी लावून बल्लारपूर येथून अवैधरित्या गडचिरोली जिल्हात जाणारी दारू जप्त करून दोन आरोपी ला अटक करून कारवाई केली पुढील तपास ठाणेदार असिफ राजा शेख यांचा मार्गदर्शन मध्ये API पांडे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये