ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कराटे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समितीने कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले. या कराटे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन 27 फेब्रुवारीला करण्यात आले.

प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून लाभलेल्या सेन्साई कुमारी कृष्णा समरीत यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थिनी व महिलांनी महिला संरक्षणासाठी जी कौशल्य कामात येतात त्या कौशल्य विषयी माहिती व प्रशिक्षण दिल. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महिलांनी आणि मुलींनी स्वकौशल्य आत्मसात करून आपलं व समाजाचे रक्षण करण्यास सक्षम होने काळाची गरज आहे याविषयी मार्गदर्शन केले.

महिला तक्रार निवारण समितीच्या समन्वयक प्रा. डॉ किरण बोरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात महिला तक्रार निवारण समितीचे कार्य आणि प्रशिक्षण मुलींनी का घ्यावेत याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन कुमारी पल्लवी राऊत यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. महानंद भाकरे, प्रा डॉ रागिनी पाटील, प्रा.स्मिता राऊत श्री गणेश गड्डमवार,श्री नरेश आलम,रामचंद्रजी सातक, श्री गिरीश डोंगरवार, श्री सागर येलटीवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये