ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीने जागतिक लसीकरण दिवस साजरा

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

   राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर येथील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 16 मार्च 2024 ला जागतिक लसीकरण दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात जागतिक लसीकरण दिवसानिमित्त विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये डॉ. किरन बोरकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी लसीकरणा बद्दल जाणिव जागृती केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या पोस्टर द्वारे लसीकरण किती महत्त्वाचे आहे हे लोकांना पटवून दिले. एकेकाळी जीवघेणा ठरणाऱ्या रोगांचे उच्चाटन करण्यासाठी लस महत्त्वाची भूमिका बजावते. पोलिओ आणि देवीसारखे आजार मोठ्या प्रमाणात पसरले होते. आणि या रोगांवर लसीकरण होईपर्यंत त्यांनी बरेच प्राण गमावले होते.

लसीकरणामुळे आजारांचा धोका न पत्करता चांगले आयुष्य जगता येते. स्वत:ला सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. या जनजागृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा प्रकाश घागरगुंडे, प्रा. पल्लवी बोरकर, प्रा. रागिणी उमलवार तसेच श्री गणेश गड्डमवार यांचे सहकार्य लाभले.याप्रसंगी प्राणीशास्त्र विभागातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये