ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

….आणि 30 वर्षानी अनुभवले मित्रांनी वर्ग मित्रांचा सहवास

1994 ते 2024 या तीस वर्षाचा प्रदिर्घ कालावधी नंतर भेटले वर्गमित्र 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. रमेश माहूरपावर

वर्षापूर्वी येथील नवभारत विद्यालय येथे 10 व्या वर्गात शिकणारे वर्गमित्र सोमनाथ येथे एकत्र आले. यावेळी सर्वच मित्रांना झालेले आनंद अगदी ओसंडून वाहतानाचा अनुभव येत होता.

प्राथमिक शिक्षणासोबतच माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या काही वर मित्रांनी सतीश मुत्यालवार,अशोक गगपल्लीवार,संजय खानोरकर,राजेश साखरकर,अविनाश चिलके,गणेश रामशेट्टीवार,जितेंद्र तंगडपल्लीवार,विक्की टहलियानी यांनी सर्व मित्रांना एकत्रित आणण्याचा योजने विषयी कल्पना मांडून 17 मार्च 2024 ला प्रत्यक्षात आणली. 17 मार्च ला रमेश माहूरपवार,फारुख शेख,उमेश पटेल,राम खियानी,प्रवीण गोयल,जितेंद्र अग्रवाल,सिकंदर लेनगुरे,संतोष वाढई,जावेद शेख,रवी केशवाणी,सचिन पुल्लावार,मुकेश गोवर्धन,मनोज कावळे,रोशन नरुले,प्रशांत समर्थ,सत्यवान दिवटे,संघपाल उराडे,राकेश भुमनवार,दीपक कुंदोजवार,राजेश ठाकरे,संतोष घाटे,संजय मेश्राम,मोरेश्वर लोनबले,कुमार दुधे,तारकेश येलोरे,प्रवीण रोहणकर,किशोर भोयर,संजय भोयर,विजय कामनपल्लीवार,गुलशन टहलियानी,संजय जिवतोडे,मारोती नागापुरे,हेमचंद डांगे,अतुल बुरांडे,विनोद बुक्कावार,बरकत सय्यद,संजय आगडे,विजय दुर्गे,प्रमोद कोकुलवार,किशोर मोहुर्ले,मनोज गुज्जनवार,जितेंद्र नागोशे,मधुकर पोहणकर,संजय गावातूरे,डॉ. युवराज घोसेकर,गणेश चीटलोजवार,संजय ठाकरे,मदन अडवाणी,अमोल् गुलभमवार हे सर्व 1994 च्या बॅच चे मित्र आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येथील नवभारत विद्यालयाचा परिसरात एकत्रित जमले. यानंतर सोमनाथ येथे जेवणाचा एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वर्गमित्र असलेले आणि नागपूर येथ वैद्यकिय सेवा देणारे डॉ.सुशील वैरागडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणीतील गंमतीजमती सांगितल्या. हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मित्रांना धन्यवाद देताना वैद्यकिय सल्ला तसेच मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर राहणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रोजगार करून आपल्या कौटुंबिक जबाबदारी संभाळणाऱ्या सर्वच मित्रांनी आपाआपला परिचय देऊन मनोगत व्यक्त केले. जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त करण्यात येऊन या दिमाखदार कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये