ताज्या घडामोडी

विवेकानंद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

अतुल कोल्हे भद्रावती

स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. सुधीर आष्टुनकर होते. या योग मार्गदर्शन कार्यक्रमाला मंचावर पतंजली महिला योग समिती भद्रावती येथील योगशिक्षिका सरिता सातपुते, कान्होपात्रा कावळे, शीला तुराणकर, कल्पना आवारी, डॉ.उत्तम घोसरे उपस्थित होते. यावेळी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले व उपस्थितांना शपथही देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन डॉ. रमेश पारेलवार, प्रास्ताविक प्रा. संगीता बांबोळे, आभारप्रदर्शन डॉ. उत्तम घोसरे यांनी केले.संस्थाध्यक्ष पु.वा.स्वान, सचिव अमन टेमुर्डे, प्राचार्य डॉ नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये