Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे चिमुकल्यांनी जाणुन घेतले गोपाल काल्याचे महत्त्व

चांदा ब्लास्ट

शालेय जीवनात मुलांचा सर्वांगीण विकास हा मुख्य उद्देश्य असतो. त्यात शारिरीक, बौद्धिक, मानसिक तसेच सामाजिक विकासाकडेचांदा पब्लिक स्कूल येथे चिमुकल्यांनी जाणुन घेतले गोपाल काल्याचे महत्त्व प्रामुख्याने लक्ष दिल्या जाते. सामाजिक जीवनात एकत्र, प्रेमाने सहकार्य करीत जीवनाचा आनंद कसा घ्यायचा याचे उदाहरण द्यायचे झाले तर कृष्ण कथेतील बालपणीचे प्रसंग खुप उपयोगी पडतात. मैत्री कशी असावी यांचे उत्तम उदाहरण म्हणजे कृष्ण आणि सुदामा. हीच मैत्रीची भावना मुलांच्या मनामध्ये रूजविण्यासाठी कृष्ण जन्माष्ठमी निमित्त चांदा पब्लिक स्कूल येथे दहीहांडीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी सौ. वसुंधरा देशमुख यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शिक्षिकेद्वारा कृष्ण भजनाने करण्यात आली. शाळेचे प्रांगण जणु वृंदावन वाटत होते. कारण सर्वांनी कृष्ण, राधाची वेशभुषा केली होती. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी दहीहांडीत उत्साहाने सहभाग घेतला.

दहीहांडीनंतर पुर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आणलेली सामग्री एकत्र करीत त्याचा काला तयार करून तो सर्वांनी आनंदाने ग्रहण केला. अशाप्रकारे सर्वांनी फुल न फुलाची पाकळी देत आपला सहभाग दाखवुन समानतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी बालगोपालांचे तोंडभरुन कौतुक केले. शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी कृष्ण जन्माच्या निमित्ताने मुलांना मित्रता आणि समानतेचे महत्त्व समजावुन सांगितले. हा कार्यक्रम पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका मनिषा नागोसे व पुजा मिश्रा यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका मंजुश्री नवरखेले यांनी केले. कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये