ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड येथील बस स्थानक बांधकाम कासव गतीने

प्रवाशाचे हाल., ब्रीद वाक्य नावापुरते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड येथील बस स्थानकाचे काम कासव गतीने सुरू असल्याने गेल्या ५वर्षांपासून प्रवाशांना उन वारा, पाऊस यांचा सामना करीत पान टपऱ्या चा आसरा घ्यावा लागत आहे मात्र गेल्या दोन वर्षांपासून बस स्थानकाचे काम कासव गतीने सुरू आहे यामुळे प्रवाशी सेवेसाठी तत्पर असलेली बस सेवा नावापुरती उरली आहे.

नागभीड येथील बस स्थानक मध्यवर्ती शहर असून गडचिरोली नागपूर चंद्रपूर आणि भंडारा जिल्हा सीमा सरहद्दीवर आहे. यामुळे अनेक प्रवाशी या मार्गावरून जात असतात पण बस स्थानकाचे काम कासव गतीने सुरू असल्याने प्रवाशाचे हाल होत असल्याचे चित्र दिसून येत असून एस टी महामंडळ याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये