Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपूरी येथे २७ ऑगस्ट ला दहीहंडी उत्सवाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपूरी क्रिडा व सांस्कृतिक समीतीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमीत्ताने भव्य विदर्भस्तरिय दहीहंडी उत्सवाचे आयोजन आज दि.२७ आॅगस्ट २०२४ रोजी मंगळवारी , सायंकाळी ४ वाजता, ब्रम्हपूरी शहरातील शिवाजी महाराज चौकात करण्यात आले आहे.

या दहीहंडी कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्ष म्हणून खासदार डॉ नामदेव किरसान हे उपस्थित राहणार आहेत.

या दहीहंडी उत्सवात प्रथम पारितोषिक महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून ७७,७७७ रू. तर द्वितीय पारितोषिक जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार यांच्या कडून ३३,३३३ रू. आहे. या दहीहंडी उत्सवाला ब्रम्हपूरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये