Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व. पंतप्रधान राजीव गांधी व स्व. हरिभाऊ डोहे गुरुजी यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूरः सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे संस्थापक सचिव स्व. हरिभाऊ डोरे गुरुजी यांच्या ३१ व्या पुण्यतिथी निमित्त तसेच माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले विद्यालय, क. महाविदयालय गडचांइर, तसेच शरदराव पवार महाविद‌यालय गडचांदूर, सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल, गडचांदूर, संजय गांधी विद्यालय क. महाविद्यालय पेल्लोरा, स्व. हरिभाऊ डोहे माध्य विद‌यालय कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने शरदराव पवार महाविद्यालयाच्या सभागृहात दि. 20 ऑगस्ट 2024 ला आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांनी अधिक परिश्रम घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष तु. ता. पुंजेकर, संस्थेचे सचिव नामदेवराव बोबडे, संस्थेचे संचालक नो. शा. मंगरुळकर, मा. ना. मंदे, संचालिका श्रीमती नलिनी डोहे, प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह, मुख्याध्यापक सर्वस्वी धर्मराज काळे, विनोद, हेपट, संजय गाडगे,इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या वर्षा खोडके. ई. उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथीनी स्व. हरिभाऊ डोहे गुरुजी तसेच स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जीवन‌कार्यावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन सर्वांनी समाजकार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले विद्यालयाचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचारलन कला विभागप्रमुख प्रा. प्रशांत खैरे यांनी केले. तर आभार ज्येष्ठ शिक्षिका ज्योती चटप यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेअंतर्गत संचालित सर्व शाळा, कनिष्ठ महाविदयालय, तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कनिष्ठ व्याख्याते, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये