ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे महविकास आघाडी ची कार्यकर्ता बैठक संपन्न

मतदासंघातीलच उमेदवार द्यावा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 शिवसेना कार्यालय मुक्ताई भवन बस स्टँड समोर येथे 25 ऑगस्ट ला महाविकास आघाडीच्या वतीने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूक संदर्भात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या ची आढावा बैठक पार पडली या बैठकीला इच्छुक उमेदवार व महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

महाविकास आघाडी च्या वतीने मतदारसंघातीलच उमेदवाराला तिकीट देण्यात यावे, गद्दार तसेच बाहेरील उमेदवाराला तिकीट देण्यात येऊ नये अशी मागणी उपास्थित कार्यकर्त्यांनी केली, शेवटी महाविकास आघाडी तर्फे ज्याला उमेदवारी देण्यात येईल त्याला निवडून आणण्यासाठी सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तन, मन धनाने एकनिष्ठ राहून काम केले जाईल अशी ग्वाही दिली.

 याप्रसंगी अनिल सावजी, गोविराव झोरे,दिलीप भाऊ वाघ, रमेश दादा कायंदे,वसंत आप्पा खुळे,अजय शिवरकर,विष्णू झोरे,अनिफ भाई शाहा ,प्रमोद घोंगें , प्रा अशोक डोईफोडे,आयुब शाहा,पवन झोरे, नितेश देशमुख, मोहन खांडेभराड, यांनी मार्गदर्शन केले,रवींद्र इंगळे, सदाशिव मुख्याधल , मच्छिंद्रनाथ मुख्याधल, मुन्ना ठाकूर, संभाजी मुद्गुल, सुनील शिंदे, संतोष पिंपल, तोसिफ कोटकर, किशोर जामदार, अश्फाक टेलर, मोहम्मद रहीस विठोबा पवार, नितीन हटकर, शंकर शिवरकर, अजय सुरसे, अर्जुन शिवरकर, संदीप शिवरकर,सर्व महाविकास आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, सभेचे आभार प्रदर्शन किशोर जामदार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये