Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषिकन्याचे पिकांना रासायनिक खत देण्याबाबत मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  येथील समर्थ कृषी महाविद्यालयाच्यावतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खते देण्याबाबत शेतकऱ्यांना उंबरखेड येथे मार्गदर्शन करण्यात आले.

समर्थ महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थीनी गौरी देशमुख, दिपाली मोरे, पूजा मांडवकर, अर्पिता नागरे, प्रियदर्शिनी राठोड, समिक्षा वैद्य, सायली सरनाईक, श्रद्धा खर्डे, तेजल धाकडे, हेमलता कुमरे, साक्षी काळे, यांनी कृषि कार्यानुभव अंतर्गत खते कशी वापरावी, या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सध्या मुंग, उडीद, कपाशी, मिरची, अद्रक या पिकावर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आता व्यवस्थित खते देण्याची वेळ आली असल्याचे यांनी सांगितले.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितिन मेहेत्रे, प्रा. मोहजीतसिंग राजपूत प्रा. किरण ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना खत कसे द्यायचे याचे प्रत्यक्षिकही दाखवून दिले. यावेळी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये