Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अंतर्गत दोन दिवसीय निपुण कार्यशाळेचे आयोजन

जिप शिक्षण विभागाद्वारे जिल्ह्यातील 60 शिक्षकांना केले जातेय प्रशिक्षित

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सन 2026 – 27 पर्यंत प्राथमिक स्तरावर मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य निपुण भारत योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना नैपुण्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही असे आकडेवारीतून दिसुन येत असल्याने 3 ते 9 वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारे मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियान अंतर्गत विद्यार्थी गुणवत्ता विकासाकरिता निपुण कार्यशाळा दिनांक 26 व 27 ऑगस्ट 2024 ला सेंट मायकल इंग्लिश स्कूल, रामनगर चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील 15 तालुक्यामधून प्रत्येकी 4 असे एकूण 60 शिक्षक प्रशिक्षणार्थी निवडण्यात आले असुन पुढे हे प्रशिक्षित तज्ज्ञ प्रशिक्षक आपापल्या तालुक्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षित करणार आहेत. सदर कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नामदेव माळी, सेवानिवृत्त सहा. संचालक, सांगली तसेच प्रतिभा भराडे, सेवानिवृत्त, विस्तार अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन अश्विनी सोनवणे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक निवास कांबळे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, चंद्रपूर तथा उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये