ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेती क्षेत्रामधील नाविन्यपूर्ण संधीचा लाभ घ्यावा – डॉ. विष्णुकांत टेकाळे

रा.से.यो.शिबिरात विद्यार्थ्यांना आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जिबगाव येथे आयोजित महाविद्यालयस्तरीय विशेष शिबिराच्या १८ जानेवारी २०२४ तिसऱ्या दिवसातील बौद्धिक सत्रातील कृषी विषयक तंत्रज्ञान व कृषी क्षेत्रातील नवीन संधी या विषयावर मार्गदर्शन करताना कृषी महाविद्यालय मुल येथील सहयोगी अधिव्याख्याता डॉ. विष्णुकांत टेकाडे यांनी कृषी क्षेत्रामध्ये भरपूर आणि नाविन्यपूर्ण संधी असून याचा लाभ घेऊन आपलं करियर घडवाव.कृषी क्षेत्रातील उद्योगांना आज भरपूर संधी असून त्यातील संधी शोधून स्वयंरोजगार करावा असे मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील ॲग्रो फोरम समन्वयक प्रा.प्रशांत वासाडे हे प्रमुख उपस्थित होते.

प्रा.प्रशांत वासाडे यांनीही महाविद्यालयामध्ये कार्यरत ऍग्रो फोरम चे उद्दिष्ट स्पष्ट करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवहान केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप कामडी,डॉ.रामचंद्र वासेकर,डॉ.रागिनी पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु. समिधा आगळे हिने केले तर आभार तन्वी वाकुडकर हिने मानले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये