ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाणकी येथे जीर्ण नाल्याच्या ओव्हर फ्लो

पाण्यामुळे आजोबा व नातनीच्या गेला जीव ! 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तहसील तालुक्यातील चानकी गावाजळून वाहणाऱ्या नाल्यावरील रस्ता ओलांडताना पुलावरून ओव्हर फ्लो पाण्यामुळे चानकी येथील लाला सुरपाम वय 60 वर्ष व त्यांची नातीन कु. नायरा साटोने वय 9 वर्षे वाहून गेलेल्या घटना आहे हि घटना अंदाजे रात्री 8.30.ते 9 वाजता दरम्यान घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील शेखर भोयर यांनी माहिती पोलिस स्टेशन अल्लीपुर येथे देताच पोलीस स्टेशन अल्लीपुर ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल डाहुले हे आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले व नंतर गावातील नागरिकांसोबत रात्रीच शोधा शोध घेणे सुरू केले तरी मात्र यश न आल्याने एनडीआरएफच्या पथकास पाचारण करण्यात आले वृत्त लीहे पर्यंत वाहून जाणाऱ्याचा शोध लागला नाही.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये