ताज्या घडामोडी
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा दौरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड दि.12 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
दि.12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता यवतमाळ येथून श्रीक्षेत्र आजनसराकडे प्रयाण करतील. सायंकाळी 5 वाजता श्रीक्षेत्र आजनसरा येथे आगमन व दर्शन व श्री. संत भोजाजी महाराज पुण्यतिथी वार्षिक उत्सव, महाआरती, समाधीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत यवतमाळ व वर्धा जिल्ह्यादरम्यान वर्धा नदीवर बांधण्यात येणाऱ्या मोठ्या पुलाच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता आजनसरा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.



