ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शबरी घरकुल योजनेअंतर्गत १०३६ लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा लाभ

विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या प्रयत्नांचे फलित -सावली, सिंदेवाही तालुक्याचा समावेश

चांदा ब्लास्ट

ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली व सिंदेवाही तालुक्यातील आदिवासी बांधवांचे हक्काच्या घराचे स्वप्न अखेर पूर्ण होणार असून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून आदिवासी विकास विभागाच्या शबरी घरकुल योजनेअंतर्गत १०३६ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे.  लवकरच सावली व सिंदेवाही तालुक्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील वास्तव्यास असलेल्या विविध समाजाकरिता शासनाच्या जन कल्याणकारी योजनेअंतर्गत योजनांचा लाभ होऊन प्रत्येक समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार हे नेहमीच प्रयत्नशील असतात. सत्तेत असो किंवा विरोधी बाकावर असो विकासात तडजोड नाही. असा दूर दृष्टिकोन ठेवणारे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सावली व सिंदेवाही या दोन्ही तालुक्यातील आदिवासी समाजातील नागरिकांकरिता शासन स्तरावर अथक परिश्रम घेऊन शासनाच्या आदिवासी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शबरी घरकुल योजनेअंतर्गत सावली तालुक्यात ३२३ व सिंदेवाही तालुक्यात ७१३ असे एकूण १०३६ घरकुलांना मंजुरी मिळवून दिली.

तत्पूर्वी भटक्या व विमुक्त जाती जमातींकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत ब्रह्मपुरी मतदार संघातील तीनही तालुक्यात हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मिळवून दिला आहे. नुकत्याच शबरी घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांमुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून लाभार्थ्यांनी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये