देवलागुडा येथे सेवालाल महाराज जयंती उत्साहात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती : बंजारा समाजाचे धर्मगुरु, संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती १६ फेब्रुवारी रोजी जिवती तालुक्यातील देवलागुडा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गावांतील नाईक कारभारी व प्रतिष्ठित नागरीकांच्या उपस्थितीत देवलागुडा येथून नाच गाण्याच्या तालावर व घोड्यावर सेवालाल महाराजांच्या वेशभूषेत स्वार केली तसेच गावांतील महिला पारंपरिक वेशभूषेत नाचत जिवती येथील रामराव महाराज पुतळ्यापर्यंत रॅली काढून जल्लोष साजरा केला त्यानंतर गावात सेवालाल महाराजांच्या मंदिरा समोर भोग भंडार कार्यक्रम करण्यात आला.तसेच यावर्षी गावातून यावर्षी शासकीय नोकरीवर लागलेल्या शुभम चव्हाण यांचा दत्ता चव्हाण यांच्या कडून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी गावांतील नाईक अशोक जाधव, कारभारी पांडुरंग पवार, सरपंच सुनिता जाधव, प्रतिष्ठित नागरिक शंकर राठोड, शिवाजी राठोड, गोविंद राठोड,गणेश राठोड, गोविंद जाधव, गजानन जाधव, कैलास जाधव, प्रेम राठोड सह गावांतील संपूर्ण युवक, महिला पुरुष व कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.