गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाकेबंदी करुन 2 आरोपीचे ताब्यातुन मोठा शस्त्रसाठा जप्त

एकूण 60 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 15/02/2024 रोजी पोलीस स्टेशन वर्धा परीसरात स्थानिक गुन्हे शाखेचे 03 पथके गुन्हेगार चेक व अवैध धंद्यावर कार्यवाही करने करिता पेट्रोलिंग करित असतांना मुखबिरद्वारे गोपनीय माहिती मिळाली की, दोन ईसम हे लाल रंगाचे मोटरसायकलवर अवैधरीत्या शस्त्रसाठा बाळगून त्याची बोरगाव येथून अशोकनगर कडे वाहतूक करीत आहे अशा माहितीच्या आधारे सावळा रचुन इसम शैलेश धर्मा नाडे वय 24 वर्ष रा. अशोक नगर वर्धा त्याचा साथीदार राजा लोंढे रा. अशोक नगर वर्धा यांच्यावर छापा घातला असता राजा लोंढे हा अंधारातून पसार झाला मो सा चालक शैलेश नाडे हा जागीच मिळून आला त्याचे ताब्यातून जप्त मुद्देमाल 1) चार मोठ्या लोखंडी धारदार तलवारी कि.4000/- रू 2) 05 मोठे फरसे किंमत 6000/- रु 3) एक जुनी वापरती मोटर सायकल किंमत 50000/- रू असा एकूण जुमला किंमत 60,000/- हजार रुपयांचा माल मिळून आल्याने त्यास अवैध्य शस्त्र बाळगणे बाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने सदर दोन्ही ईसम हे कोणतातरी संवेदनशील असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याचे इराद्याने शस्त्रसाठा आणल्याची आमची खात्री झाल्याने सदर इसम शैलेश नाडे यास ताब्यात घेऊन जप्ती पंचनामा कारवाई करून दोन्ही आरोपी विरुद्ध पो. स्टे वर्धा शहर येथे गुन्हा दाखल करून आरोपी शैलेश नाडे यास रीतसर अटक करून पुढील कारवाईस पोस्ट वर्धा शहर येथे यांचे ताब्यात दिले.

सदर कारवाई मा. श्री. नुरुल हसन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. कांचन पांडे, प्रभारी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि सलाम कुरेशी, पो.हवा. नरेंद्र पराशर, गजानन लामसे, सचिन इंगोले, अमरदिप पाटील, यशवंत गोल्हार, रितेश शर्मा,राम इप्पर, नितीन इटकरे, संघसेन कांबळे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये