ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदेशी दारू एकूण 7 लाख 38 हजार 350 रू चा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 14.02.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक हे पोलीस उपविभागीय कार्यालय वर्धा येथे कार्यालयीन कामकाज करीत असता गोपनिय माहीती मिळाली वरून जायका हॉटेलच्या मागे शिवनगरी येथे किरायांनी असलेली रूमवर प्रोव्हीशन रेड केला असता मौक्यावर 1) पियुश सुभाष जैस्वाल वय 26 वर्ष रा. वार्ड न. 5 गणेश नगर वर्धा जि. वर्धा 2) सौरभ जितेन्द्र भगत वय 23 वर्ष रा. वार्ड न. ३ गणेश नगर, बोरगांव मेघे, वर्धा जि. वर्धा यांचे किरायाचे रूम मधुन व त्याचे रूम समोर उभे असलेली त्यांची जुनी वापरती सिल्वर रंगांची होन्डा कंपनीची सिटी चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. 32 ए.एस. 7152 यांचे डिक्की मध्ये तसेच एक पांढ-या रंगाची सुजुकी कपंनीची बर्गमॅन क्रमांक एम.एच. 32 ए.यु 5644 हीच्या डिक्की मध्ये वेगवेगळ्या कपंनीच्या विदेशी दारू च्या शिश्या बियर दारूने भरलेली टिन कॅन असा एकुन दारू व एक चारचाकी वाहन, दुचाकी वाहन, एक विवो कंपनीचा मोबाईल असा एकुन जु. किंमत 7,38,350/-रु. चा माल अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली.

सदर आरोपीतांना विदेशी दारूचा माल कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की सदर विदेशी दारूचा माल हा अमरावती जिल्हयातील विटाळा येथुन उदर बार मधुन आणला आहे त्याचे मालक अंकीत जयस्वाल रा. सावंगी मेघे वर्धा असे आहे, असे सांगीतल्याने बार मालक अंकीत जयस्वाल रा. सावंगी मेघे वर्धा यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपीस दारूचा माल देवुन त्यास सहकार्य केल्याने त्याचे कृत्य म.दा.का. कलम 82 प्रमाणे होत असल्याने सदर गुन्हयात बार मालक यास आरोपी बनविण्यात आले आहे. पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे आरोपीतांविरूध्द 1) अपराध क्रमांक 111/2024 कलम 65 ई, 77 अ, 82, 83, म.दा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. सावंगी मेघे येथील पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. रोशन पंडीत सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप. नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पो.शि, मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये