ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नगर परिषदेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
नगर परिषद देऊळगाव राजा याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले,39 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या वतीने 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अरुण मोकळ यांच्या मार्गदर्शनामध्ये सात दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये 39 रक्तदात्यांनी रक्तदान केले याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा अमृत महोत्सवाच्या वतीने करण्यात आलेले आहे जालना येथील रक्तपेढीने रक्तदान करून घेतले.
रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी अरुण मोकळ तथा नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.