ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषदेच्या वतीने नगर परिषदेचे सेवा निवृत्त कर्मचारी,शिक्षक, मुख्याध्यापक व पत्रकारांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

       देऊळगाव राजा नगरपरिषद च्या 75 व्या अमृत महोत्सवा वर्षा निमित्त नगर परिषदेमधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, शिक्षक,मुख्याध्यापक व पत्रकारांचा नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री अरुण मोकळ यांनी सत्कार केला

        नगरपरिषद देऊळगाव राजा ला 75 वर्षे पूर्ण होत असून अमृत महोत्सवानिमित्त प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या संकल्पनेमधून विविध कार्यक्रमाचे आयोजन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे .नगरपरिषद कार्यालयामध्ये सेवानिवृत्त झालेले कर्मचारी तसेच नगर परिषदेच्या प्राथमिक व हायस्कूल शाळेमध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षक तसेच शहर व तालुक्यातील सर्व पत्रकाराचा सत्कार पालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ हे होते .अरुण मोकळ यांच्या हस्ते .सर्व सेवा नियुक्त कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पत्रकार यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .

        याप्रसंगी अरुण लताड सर नंदलाल शर्मा सर गोविंद अहिरे पत्रकार सुरज गुप्ता व अर्जुन आंधळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना मुख्याधिकारी अरुण मोकळे यांनी नगरपरिषद कार्यालयाला 75 वर्षे पूर्ण झाले असून हा अतिशय आनंदाचा क्षण शहरवासीयांसाठी आहे यानिमित्त आम्ही पालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजित केले आहे .पालिकेमध्ये सेवा देऊन निवृत्त झालेले कर्मचारी व शिक्षक यांचाही पालिकेच्या विकासामध्ये मोठा वाटा आहे त्यांचा सन्मान होणे हे गरजेचे होते सोबतच मागील 75 वर्षापासून पत्रकारांनीही आपल्या लेखणीच्या माध्यमातून पालिकेच्या विविध विकास कामांनाप्रसिद्धी दिली तसेच नागरिकांच्या समस्या या सुद्धा मांडल्या त्यांचाही सन्मान याप्रसंगी करण्यात आला याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम याचे आयोजित करण्यात आले आहे.असे मनोगत त्यांनी व्यक्त केले .

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये