ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्ता सुरक्षा जनजागृति २०२४

यशवंत महाविद्यालय येथे घेण्यात आले प्रात्याशिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक ३१/०१/२०२४ रस्ता सुरक्षा जनजागृति २०२४ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, वर्धा १०८ रुग्णवाहिका सेवा, वर्धा अग्निशामक दलाची वाहन आणि यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज यशवंत महाविद्यालय येथे प्रात्याशिक घेण्यात आले आणि रस्ते अपघाताबाबत व अपघात घडल्यानंतर अपघात झालेल्या रुग्णाला कश्या प्रकारे तत्काळ मदत करुन उपचार देता येईल (CPR AND OTHER) व १०८ रुग्णवाहिकेला बोलून कश्या प्रकारे जीव वाचवता येईल ह्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ह्या कार्यक्रमात मोटार वाहन निरीक्षक मेघल अनासने साहेब, मोटार वाहन निरीक्षक संदीप मुखे साहेब, मोटार वाहन निरक्षक अजय चौधरी साहेब, स. मो. वा. नि अक्षय मालवे, राहूल राठोड आणि चालक तिवारी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पार आयोजित करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये