ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान च्या देऊळगाव राजा तालुका अध्यक्षपदी कौतिकराव झिने यांची निवड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 कलेबरोबरच कलावंताचे हितसंवर्धन साधनारी राज्यातील महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान ही संघटना अधिक भरभराटीस आली असून या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर जिल्हास्तरीय तालुकास्तरीय व शहर स्तरीय कार्यकारिणी घोषित करण्याचे काम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

देऊळगाव राजा तालुका अध्यक्षपदी येथील शाहीर कलावंत कौतिकराव उत्तम झिणे तर उपाध्यक्षपदी शाहीर कलावंत अशोक दामाजी मुख्यदल, त्यासोबतच सचिव पदी विकास बाबुराव मुख्यदल,कोषाध्यक्षपदी केरूबा हरी शिंदे, कार्यकारणी सदस्य पदी लक्ष्मीकांत पुंडलिक ठोंबरे, छबुराव बाबुराव पाटोळे, ज्ञानेश्वर गणपत शिंगणे यांची राज्याचे अध्यक्ष शाहीर सुरेशचंद्र आहेर राज्य सरचिटणीस शाहीर अशोक भालेराव, व राज्य उपाध्यक्ष शाहीर रामभाऊ घोडके यांनी पुढील दोन वर्षाकरिता नियुक्ती केली आहे त्यांच्या या निवडीनंतर बुलढाणा जिल्हाध्यक्ष शाहीर अमोल जायभाये व सचिव शाहीर काशिनाथ रूपचंद फुलमाळी यांनी सर्व नवीन कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तालुक्यात शाहीर कलावंतांना वेळोवेळी जे मार्गदर्शन लागणार आहे ते या संस्थेच्या मार्फत देण्याचे यावेळी काशिनाथ फुलमाळी यांनी आश्वासित केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये