Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय औ. प्र. संस्थेच्या वतीने २१ प्रशिक्षणार्थांचे रक्तदान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

     जिल्हा अग्रणी बँक चंद्रपूर च्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबीरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या २१ स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्त रक्तदान केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी बी. आर. बोढेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक राजु नंदनवार, अग्रणी बँक अधिकारी अतुल तागडे, निदेशक अभय घटे, श्री. पवन धुळसे आदींची उपस्थिती होती.

      बँक ऑफ इंडिया तुकूम शाखेच्या सभागृहात झालेल्या या रक्तदान शिबीरासाठी डॉ. हेडगेवार ब्लड सेंटर नागपूर यांचे सहकार्य लाभले होते. या शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये