Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सार्वजनिक गणेश मंडळच्या आरती करण्याच्या माना वरून चाकू हल्ला

७ आरोपीविरोधात गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शिवाजी नगर देऊळगाव राजा येथे एका सार्वजनिक गणेश मंडळ मध्ये आरती करण्याच्या माना वरून चाकु हल्ला झाल्याची घटना १० सप्टेंबर रोजी रात्री ८.३० च्या दरम्यान घडली आहे, पोलिसांनी ७ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शिवाजीनगर देउळगावराज येथे सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केलेली असुन सदर गणेश मंडळाची आरती मान फिर्यादी रामेश्र्वर दत्तात्रय पवार यांच्याकडे होता परंतु त्यांनी त्यांच्या वतीने आरतीचा मान त्यांचा भाऊ परमेश्वर उर्फ बाळु दत्तात्रय पवार याला पाठवले आरोपीनी त्यास आरती करण्यास नकार दिला व त्यास म्हणाले की ज्यांची वर्गणी नाही त्याला आरती करण्याचा अधिकार नाही असे म्हणुन फि चे भाउ व त्याच्या पत्नीस भांडण झगडे करून लाथाबुक्याने मारहाण करत आरोपी अंकुश हरीभाउ घोंगे याने त्याचे पँटच्या खिश्यातुन चाकु काढून परमेश्वर पवार याचा जिव घेण्याच्या उददेशाने छातीवर, बरगडीवर व पोटाच्या डाव्या भागावर चाकूने पांच, सहा वार करून गंभीर जखमी केले पोलिसांनी आरोपी अंकुश घोंगे, कविता घोंगे, शिवाजी घोंगे, सर्व रा शिवाजी नगर, सोमेश शेळके, रा कवले वाडी व इतर तीन अशा एकूण सात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दत्ता नरवाडे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये