ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथील पूर्व प्राथमिक विभागात ‘स्पोर्ट फिएस्टा 2के23-24’ चे आयोजन 

चांदा ब्लास्ट

स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो. विद्यार्थी जीवनात मानसिक विकासासोबतच शारिरीक विकास होणे गरजेचे असते आणि तो विकास फक्त मैदानी खेळ खेळल्याने होतो. हाच हेतू लक्षात घेता चांदा पब्लिक स्कूल येथील पूर्व प्राथमिक विभागात ‘स्पोर्ट फिएस्टा 2के23-24’ चे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरवात उपस्थित प्रमुख अध्यक्ष अॅड. अभय पाचपोर, डॉ. कीर्तीवर्धन दिक्षित, श्री. अशोक हसानी यांच्या हस्ते ध्वजारोहन व खेळाडू मशाल पेटवून करण्यात आली.

नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी. शिक्षकांनी आपल्या वर्गाचे प्रतिनिधित्व करत विद्यार्थ्यांसोबत संचालन केले.

वर्ग 1 ली व 2 री च्या विद्यार्थ्यांनी पालक व उपस्थित पाहूण्यांच्या स्वागताहर्त स्वागतपर नृत्य व विविध खेळांचे प्रदर्शन दाखविणारे नृत्य सादर करून विद्यार्थ्यांना व पालकांना खेळण्यास प्रवृत्त केले.

उपस्थित प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून मैदानी खेळ खेळले पाहिजे असे वक्तव्य केले.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी आपल्या वक्तव्यात आज जर आपण आपल्या मुलांना वेळ दिला तरच मुलं मोठे झाल्यावर आपल्याला वेळ देतील हे एका गोष्टीच्या माध्यमातून पालकांना समजवून सांगितले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून खेळात विजयाच्या वेळी उत्साह असावा पण हार झाली तरी बदल्याची भावना नसावी, सतत खेळाचा सराव करावा, असे वक्तव्य केले.

अतिथींच्या हस्ते क्रिडांगणाची विधीवत पूजा करून मुख्य कार्यक्रमाची म्हणजेच ‘स्पोर्ट फिएस्टा’ ची सुरवात करण्यात आली. यामध्ये विविध खेळाचे आयोजन करण्यात आले. जसे लेटर हन्ट, टॉवर टू शेड्स, लेट्स फाईन्ड द नेम, लेट्स अप्लाय अवर लॉजीक, रेस्टो रेस, शॉपिंग मॉल रेस इ. खेळ पालक विद्यार्थ्यांसोबत म्हणजेच आपल्या पाल्यांसोबत खेळले.

विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. निलिमा पाऊनकर, परिणीता जैन व विद्यार्थीनी सौम्या शहा, जीया नगरेचा यांनी तर आभार प्रदर्शन पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांनी केले. स्पर्धेचे विवेचन श्री. फहिम शेख, सौ. रूहीना तबस्सूम, सौ. मनिषा नागोशे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शाळेतील क्रिडा शिक्षक श्री. विनोद निखाडे, प्रणोती चौधरी, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. तर संपूर्ण कार्यक्रम पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये