ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दि लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल येथे 75 प्रजासत्ताक दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

      दि पब्लिक एडुकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित दि लिटल फ्लॉवर इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूल नगीना बाग चंद्रपूर येथे 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला गुलाबराव दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आले.

देशभक्तीपर गाणे,तसेच नर्सरी ते दहावी च्या विध्यार्थी व विध्यार्थिनी ने आपली कलाकृती सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.प्रमिला दुबे व मार्मिक वानखेडे यांनी भारतीय संविधानावर मोलाचे मार्गदर्शन केले.तर या प्रसंगी विध्यार्थी व विध्यार्थिनी ना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे संचालन त्रिशाला संगमावर, व शिवम अड्डेलवार यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता मुख्याध्यापिका मीनाक्षी मून शिक्षक वृंद, शिक्षेकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये