ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोसेखुर्द प्रकल्पातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा – विजय वडेट्टीवार

गोसे अधिकाऱ्यांना आदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

    सावली तालुक्यातील गोसेखुर्द लाभधारक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश पालेबारसा येथे आयोजित केलेल्या शेतकरी समस्या निवारण बैठकीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

    गोसेखुर्द उपनलीकेचे काम करतांना शेतकऱ्यांना विश्वासात न घेणे, उभ्या पिकातून कोणताही मोबदला न देता काम करणे, चुकीच्या पद्धतीने काम करून शेतीला सिंचनापासून वंचित राहण्याची पाळी आणणे अशा विविध समस्यांचे शेतकऱ्यांचे निवेदन आले होते. या समस्या निकाली काढण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली पालेबारसा येथे अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत बांधावर जाऊन त्या समस्या सोडविण्याचे आदेश वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना दिला.

यावेळी तहसिलदार परीक्षित पाटिल, गोसेखुर्द चे अधिकरी, कांग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे, महिला तालुका कांग्रेसच्या अध्यक्ष उषाताई भोयर, माजी तालुका अध्यक्ष राजेश सिद्धम, बाजार समितीचे संचालक निखिल सूरमवार यांच्या उपस्थितिमध्ये शेतकरी समस्या निवारण विषयक बैठक पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये