भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘नमो नवमतदाता’ संम्मेलन संपन्न
पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्या आभासी मार्गदर्शनाचे सामुहिक दृकश्रवण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिल्ह्यातील नव मतदारांचा प्रतिसाद पाहून मन भारावले ; महेश देवकते जिल्हा संयोजक नमो नवमतदाता
जिवती :- २५ जानेवारी २०२४ राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने देशभरातील असंख्य नवमतदार तरूण-तरूणींशी ‘नमो नवमतदाता’ संम्मेलनाच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून जाहीर संवाद साधला, यावेळी उपरोक्त सम्मेलंन संवाद सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दुकश्रवण करण्यात आला.
नमो नवमतदाता सम्मेलंन जिल्हामध्ये सुधीर मुनगंटीवार, मंञी-वने सांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
संवादाचे राजुरा विधानसभा क्षेत्रात पाच ठिकाणी, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात दोन ठिकाणी, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात दोन ठिकाणी, वरोरा विधानसभा क्षेत्रात दोन ठिकाणी, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात दोन ठिकाणी, चिमूर विधानसभा क्षेत्रात दोन ठिकाणी अशाप्रकारे चंद्रपूर जिल्ह्यात १५ ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालय तथा भाजयुमोच्या माध्यमातून उत्कृष्ट बॅनर,फ्लॅक्स लावून पंतप्रधानांनी केलेल्या कार्याचे प्रशंसनीय नमो प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी अनेक ठिकाणी भाजपाचे नेते, आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सरपंच कार्यकर्ते यांनी उपस्थिती राहून मार्गदर्शन केले.