ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या चंद्रपुरात

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती

चांदा ब्लास्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 27 डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरात आगमन होणार असून ते 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचे सायंकाळी 4.45 वाजता मोरवा विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे ते उपस्थित राहतील. सायंकाळी 6.30 वाजता बल्लारपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये