मैत्री करून अल्पवयीन मुलाने सोन्याच्या अंगठीसह ५२ हजारानी गंडविले
तीन आरोपी अटकेत : शहरातील फुकट नगर परिसरातील घटना

चांदा ब्लास्ट —
अतुल कोल्हे भद्रावती –
शहरातील एका युवकाशी येथीलच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाशी मैत्री झाली त्याचे जवळ रोख रक्कम बघतात त्या अल्पवयीन मुलाने आपल्या तीन मित्राच्या मदतीने त्या युवकाच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल, सोन्याची अंगठी असा एकूण ५२ हजाराचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली या घटनेची युवकाने भद्रावती पोलिसात तक्रार करताच यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली. ही घटना रविवारला घडली.
यातील रोहित जगदीश पाल वय २५ वर्ष, समिक्ष संजय बारेकर वय २४, मॉन्टी गेडाम वय १९ राहणार भद्रावती अशी आरोपींची नावे आहे तर दिनेश कुंडलिक कोलटकर वय ३७ राहणार पंचशील नगर भद्रावती असे फिर्यादीचे नाव आहे. दिनेश व अल्पवयीन मुलाची काही दिवसापूर्वी मैत्री झाली. घटनेच्या दिवशी दिनेश आपल्या घराच्या छतासाठी टीना आणण्यासाठी आपल्या आईकडून रोख रक्कम २९ हजार घेऊन रविवारला दुपारी बाजारात आला होता व तो दारू पिण्यासाठी बियर बार मध्ये गेला तिथे त्याची अल्पवयीन मुलाशी भेट झाली. दोघांनी दारू पिल्यानंतर बिल देताना दिनेश जवळ मोठी रक्कम अल्पवयीन मुलाने बघितली. त्यानंतर दिनेशला फुकट नगर परिसरात मला पैसे घ्यायचे आहेत चाल असे म्हणत त्याने दूचाकी ने नेले तिथे दिनेश हा मोबाईल वर बोलत असताना वरील आरोपी घटनास्थळी पोहोचले व त्याचे अंगावर काळा कपडा टाकून त्याला खाली पाडले त्याच्या पाकीट मधील रोख रक्कम २९ हजार, मोबाईल, सोन्याची अंगठी असा ५२ हजाराचा मुद्देमाल घेऊन पसार झाले या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल केल्यानंतर अल्पवयीन मुलाला वगळता यातील तीन आरोपीला अटक करण्यात आली ही कारवाई ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सपोनी मुळे करीत आहे